Thursday, 18 May 2017

तुच तु आहेस ना

ती विचारते ,
     तुझ्या आयुष्यात माझ्यासाठी कोणती जागा आहे ?

he answered 😊

नाट्यातले भाव जसे काव्यातील शब्द ही
सर्व त्या उपमात माझीया तुच तु आहेस ना

गीत जे ओठातले कंठातले सुर ही
तान त्या सुरातली तीच तु आहेस ना

पानझड जीवनी शिशिराची जैशी वनी
मोहोर पुढती वसंताचा तुच तु आहेस ना

दुःखपुर्ण शोकांतीकेचा शेवटीचा अंक ही
आयुष्याच्या या कथेचे तात्पर्य तु आहेस ना

बाजी© Hhj

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...