लहाणपणच असे होते की आजच्या पोरांकडे पाहुन किव यावी
सुट्टीत उन्हाळ्याच्या
भर उन्हात गोट्या विटीदांडु लगोरी पितळी कबड्डी सुरपारंब्या खेळताना उन लागणे माहीतीच नवतं !
हाताला फोड आले तरी सुरपारंब्या खेळताना दोन तीन मजली बिल्डींग येवढी उंच इमारत पारंब्याने चढताना कधी त्रास व्हायचा नाही ,
आंब्याच्या कोयांचा खेळ ही चुकायचा नाही चांगल्या गोणी दीड गोणी कोयी गोळा करायच्या तसाच
उन्हात गोट्या चा नेम कधी चुकायचा नाही तर विटीदांडुच राज्य द्यायचा कंटाळायायचा नाही
गाडीचे जुने टायर घेउन जेव्हा शर्यत लावुन पळायचोत तेवा किती पळालोत ....कळतच नसायच .
लहर आली की उन्हातानाच राखणदाराला चोरुन कैर्या चोरायचो .
नेम लावुन ,दगड मारायच आणी कैर्या नंतर पिकलेले पाड टिपायचे
हे उन्हाळ्याच्या सुटीतील खेळ वेळेबरोबर आज गायब झाले
आज गोट्यातील नेम राहीला नाही
आणी गावात तो वड ही राहीला नाहीला नाही
चकर्या पळवायला उंची जास्त होते तर
विटी दांडुत येवढा हात राहीला नाही
गेले ते दिवस राहील्या गोड आठवणी
बाजी©
omkarpandav.blogspot.com
No comments:
Post a Comment