Thursday 4 May 2017

रायगडचा जगदिश्वरा जवळील शिलालेख

* पहिल्या श्लोकातील –
_______ हिदुंधर्माभिमानी शिवरायांनी श्रीगणेशाला केलेलं आद्यवंदन
______शिवरायांचा पदवीसह आलेला उल्लेख .
_________ शिवरायांचा पदवीसह आलेला नामनिर्देश
अन
__राजधानी रायगड वरील हिरोजी निर्मीत वास्तुंचा नामोल्लेख
_______ स्वतः वास्तुस्थापज्ञ हिरोजीचा ईंदुलकराचा उल्लेख .
…ह्या गोष्टी अत्यांतिक उपयुक्त आहेत .
_______त्या संस्कृत “नऊ ” जशा आहेत तशा अगोदर अभ्यासुयात .
!! श्रीगएपतेयेनमः !!
!!प्रासादोजगदीश्वरस्यजगतामानंददोनु
!! ज्ञात ! श्रीमछत्रपते शिवस्यनृपतेःसिंहासनेतिष्ठतः
!! शाकेषएनवबाएभुमिगएनादानंदसूवत्सरे ज्योतिराजा !
मुहुर्तकिर्तीमहितेशुक्लेशसार्पेतिथो !! 1 !! वापीकुपतडागराजिरू
!! चिरंहर्म्येवनंवीथिकोस्तंभैःकुभिंगृहैनरेंद्रसदनैरभ्रंलिहै
!! र्मीहितेश्रीमद्रायगिरौगिरामविषयेहिराजिनानिर्मितो
!! यावच्चंद्रदिवाकरौ विलसत स्तावस्य मुज्रुंभतो !! 2 !!
( येथे ‘ण’ हे अक्षर ‘ए’ असे अन ‘भ’ हे अक्षर ‘श्र’ असे काढलेय .)
____ व्याकरणदृष्ट्या व शब्द न तोडला हा शिलालेख असा असायला हवा होता ..
… !! श्रीगणपतेय नमः !!
प्रासादो जगदिश्वरस्य जगतामानंद दोनुज्ञय !!
श्रीमच्छत्रपतेः शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठतः !!
नाके षण्णवबाणभूमि गणदानंद संवत्सरे !
ज्योती राजमुहूर्त कीर्तिमहिते शुक्लेशसार्पे तिथौ !! 1 !!
वापी कूप तडाग राजिरूचिरै हर्म्ये वनै वीथिके !
स्तंभैः कुम्भिगृहै नरेन्द्रसदनैभ्रंलिहे र्मीहिते !!
श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हिराजिना निर्मितो !
यावच्चंद्रदिवाकरौ विलसत स्तावत्स्यमुज्जृंभते !! 2 !!
____ हिंदुधर्माचे आद्यपुजनिय दैवत श्रीगणेशाला वंदन करून हा शिलालेख हिरोजीनीं
प्रारंभ केला आहे .
प्रथम श्लोकाचा अर्थ _____
तीन्ही जगताच्या लोकांना आनंद देणारा हा जगदिश्वराचा प्रासाद सिंहासनाधिश्वर श्रीमच्छत्रपति शिवाजीराजे यांच्या आज्ञेने शके 1596 आनंदनाम संवत्सरे शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला आश्लेशा नक्षत्र असताना ह्या ज्योतिषशास्त्रातील राजमुहूर्तावर ऊभारला गेला आहे ……
_________ टीप :-
येथे ” शाके षण्नव बाणभूमि गणना ” याचा अर्थ ‘ षट् नव बाण भूमी गणना ‘ असा घेऊन – षट् = सहा , नव = नऊ , बाण = पाच , भूमी= 1 असे अंकाने अर्थ लावित जावे ..
आत्ता ___
संस्कृतमध्ये ‘ अकंनाम् वामतो गती ‘ म्हणजे हेच अंक ” 6951 ” असे न वाचता उलटे म्हणजे ” 1596 ” असे वाचावयाचे असतात .
____ ” शाके षण्नव बाणभूमी गणना ” म्हणजे शके 1596 होय …
तसेच ” शुक्लेश सार्पै तिथौ ” चा अर्थ असा आहे
_____ शुक्ल म्हणजे शुद्ध ईश = ब्रम्हा + विष्णु + महेश = 3. आणि सार्प्यै (सर्प ) =1.
म्हणूनच ” शुक्लैश सार्पै ” = 31 .
पुन्हा संस्कृतमध्ये अंक उलटे वाचावे लागतात म्हणून ” 31 ” हे “13 ” असे वाचावे .
अन “13 ” म्हणजे ‘ त्रयोदशी ‘ होय .
_____ म्हणजेच
( श्रीमन्महाराज शिवछत्रपती हे शालिवाहन शक 1596 आनंदनाम संवत्सर
जेष्ठ शुध्द त्रयोदशी ला सिहांसनाधिश्वर झाले ) .
आत्ता पुढील दुस-या श्लोकाचा अर्थ असा आहे :-
_____पाय-यांची विहीर , पाणी शेंदायचा आड , तलाव , रम्य व ने , राजरस्ते , स्तंभ , गजशाळा , अन राजांचा राजप्रासाद हे सर्व वाणीला अवर्णनीय अशा श्रीमदरायगडावर हीराजीनें निर्माण केला असुन,
तो यावच्चंद्र दिवाकर (चंद्र – सुर्य ) नभी आहेत तोपर्यंत ह्या पृथ्वीतलावर असेच तळपत राहो ..नांदत राहो .
# शब्दसूची __
वापी = पाय-यांची विहीर .
कूप = पाणी शेंदायचे आड .
तडाग = तळी – तलाव .
र्हम्यै = बगिचे .
विथीका = राजरस्ते .6
स्तंभैः = स्तंभ .
कुंभिगृहे = हत्तीशाळा .
नरेंद्रसदनै = राजांचा राजप्रासाद .
संदर्भ :
____1. दुर्गदुर्गेश्वर रायगड.
____2. रायगड स्थलदर्शन .

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...