Thursday, 28 January 2016

पानीपत

सगळ संपल असेल यावेळेपर्यंत युद्ध !
उरला असेल मांसाचा चिखल
वाहत असतील रक्ताचे पाट
घुमत असतील किंकाळ्या
तो यम सुद्धा कळवळला असेल
ते विराना सोबत नेताना.
म्हणत असतील जरी आम्ही मेलो तरी आमच्या एकाएका थेंबांपासुन
बनेल उद्याचा हिंदुस्तानी सैनिक
अन राखेल देशाची मान
कणखर
अगदी हिमालयासारखी!
बाजीराव©

अशांततेच मुळ

अशांतीच मुळ शांतता असते
कारण
शांत रहाल तर लोक तुम्हाला गृहीतच धरणार नाहीत,
ते बोलत राहतील
तुम्ही ऐकत रहाल,
शांततेतन जर काही साध्य झाल असत तर आंदोलनं युद्ध आणी क्रांत्या
झाल्याच नसत्या
तुमच्यात जर क्षमता असेल पराक्रम असेल तर कठीण परीस्थिती असली तरी ही पंख पसरवा
निदान उडता आल नाही तरी हवेत तर तंरगताल नंतर उडण्याची क्षमता तर निर्माण होईलच की.
कारण
संकट ही पराक्रमाची जननी
आणी
सत्ता ही पराक्रमाची दासी.
पराक्रम जखडल्या जखडणे अवघड!
तो समुद्राच्या लाटांप्रमाणे असतो
एखाद्याने कितीही तुम्हाला अडवायचा प्रयत्न केला तरी
आत्मिक बल जर समर्थ असेल तर
तर कोण अडविण्यास समर्थ?
म्हणुन
आतुन अशांत रहाल
तर नवनिर्मिती कराल!
  स्तःला ओळखा! आणी पंख पसरावा
भरारी मारण्याची हीच वेळ आहे !
पंखात आपोआप बळ येईल.
  

Tuesday, 19 January 2016

कधीकधी धुंद गंध असा वाहात जाहतो

कधीकधी धुंद गंध
असा वाहात जातो
कधी कधी मंद मंद
पाऊले ही टाकीतो
उमलाता कळ्या कश्या
सुगंध हा पसरितो
भुलुनी त्या सुगंधास
भ्रमर मी वेडावतो!!1!!

कधी कधी मयुरपंख असा
जीवास भावतो
रंग तो गडदसा पाहुन
तुला आठवीतो
वर्षावतो जणु वळीव
हृदयाच्या अंतरी
रानात जसा पावसात असा
मयुर कुठे नाचतो!
कधी कधी दवबिंदु का
चकाकुनी सतावतो
जगण्याचे ते एक सार
सांगुन मज सावरितो
जरी असले दो घटीकेचे जीवन
वाट प्रेमाची दाखवितो

Monday, 18 January 2016

का शिकु?

का शिकु मी

अगदी परवाची गोष्ट
आईला भेटायला गेलतो परवाच स्टेशनला .
तिथल्या पेट्रोल पंपाजवळ भिक मागनारी भांवंड दिसत होती काही
तो एक तेराचौदा वर्षाचा मुलगा मला बघुन आला पैसे मागायला
तेला द्यायला सुट्टे तर नवते पण खिशात चॉकलेट्स होती
त्यातली दोन काढुन दिली आणी म्हटलो बाबा यावर नाही देऊ शकत
आणी गाडी ची
वाट पाहत उभा राहीलो
तर त्यांच ते काम चालुच होतो
तर असाच पुन्हा तो थोडा जवळ आला ते फक्था कुतुहल म्हणुन विचारल की
काय रे कितवी ला आहेस तर म्हणाला
दादा पहिलीलाच शाळा सोडली आता कामावरुन आलो आनी हे लहान भाऊ अन बहीणीला मदत करतोय !
त्याला घरच्यां बद्दल विचारल तर म्हणे ते दहा भावंडे आहेत दोन बहीणींचे लग्न झाले
तेवा त्याला शाळेत का जात नाहीस हे विचारल तर उत्तराचा आशय काहीसा असा होता!

परिस्थिती संघर्ष करायला लावते
जन्मल्या पासुन काय करु शाळेचे चोचले करुन !
दोन पैशाला या जगात किंमत
अक्षरे शिकुन काय करु तुमच्याशी बरोबरी व्हईल का
पोटात खड्डा पडला की कळत सबसे बडा रुपया
हे लहान भाऊ बहीण रडायला लागृले की सुचत नाही काय योग्य काय अयोग्य मग शिकुन सभ्य का बनाय
बालकामगार बंद म्हणे मग आमाला अन माझ्या या भावाबृहीनीना खाऊ घालीन का सकार फुकट

का शिकु मी?

सुन्न झालो नुसता ....

बाजीराव©

Saturday, 16 January 2016

महापुरुषांचे ग्रेटनेस आणी तुलना

आज सहज fb वर फिरत होतो एक पोस्ट होती संभाजीराजेंच्या राज्याभिषेक दिनानिमीत्त
पोस्ट काहीशी अशी होती 
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी १६व्या वर्षी लिहीली पण माझ्या राजानं बुधभुषणम् वयाच्या 14व्या वर्षी लिहीला!

तस पाहील तर शंभुराजांवर मी जीवापेक्षा जास्त प्रेम करतो
त्याना आम्ही तरुण आदर्श मानतो!
त्यांचे तत्व आदर्श मानतो!
तसेच आम्ही ज्ञानेश्वराना देखील गुरुच मानतो नव्हे राजे देखील स्वतः वारकरी असो की रामदासी संप्रदाय यांचा कीती मान ठेवायचे हे आपणा सर्वास माहीतच आहे की !
मग तुम्ही तुलना कुणाची करता?
तुलना का करता?

हे फक्त या एका उदाहरणापुरतेच नृव्हे हे नेहमीच झालय!
दोन हिंदुधर्माचे आराध्य घ्यायचे आणी त्यात तुलना करायची प
एक लक्षात येत का
की आपण तुलना केव्हा करावी
जर स्वतः तितके समर्थ असु !
पण होत काय
आपल सामाजीक मुल्य भले ही शुन्य असु आपण समाजासाठी वैयक्तिक गरजा सोडता निस्वार्थ भावनेने काय केले हे आपले आपलेच आत्मचिंतन न करता
या अशा दोन महापुरुषांच्या जर तुलना करु लागलोत तर तुम्हाला मुर्ख म्हणाव लागेल
कारण
आपणा कीती खोल पाण्या पोहु शकतो हे जाणल्याबिगर जर नदीत उडी घ्याल निश्चितच मधेच गटांगळ्या खाल
आणी अशा महापुरुषांचे चरित्र हे तर त्यागाचे महासागर असतात .
त्यामानाने तुमचा त्याग बेडकाच्या डबक्याएवढाही नसेल!
मला एक कळत नाही महाराष्ट्रातले महाराष्ट्रातल्या महापुरुषांचे  तुलना करायला काय महाराष्ट्र इतका निर्बुद्ध
झालाय का?
निश्चीतच नाही ,
महाराष्ट्राला विचारवंतांची कमी काल ही नवती ती आज ही नाही !
मग हा तुलनेचा उपद्व्याप का?
तर याचे मुळ फालतु जातीय स्वाभिमानात आहे !
आणी राजकारण्यानी तर असे महापुरुष सुद्धा वाटुन दिले!
मला आठवतो माझ्या एका भाबड्या मित्रानं प्रश्न विचारला होता
कि
तुमचा देव कोणचा रं ?म्हंजी
तुमी कोणास्नी मानता?

असा प्रश्न माझ्यावर जणु वीज पडावी तसा पडला !
मन विषण्ण झाले !
मी न बोलता निघु लागताच म्हटला तो
का तुमच्यात कोणीच नाही का!
त्याच्या ह्या वाक्यानी
मला वाटल
हिंदवा सोदरा सर्वे ....ही हिंदुंची व्याख्या किंवा
वर्षंतत्भारतनाम भारतीयत्र संतती ही वेदांची व्याख्या तर आजच्या जमाण्यात लांबच राहीली
हे जातीचं गलीच्छ राजकारण
संतांपर्यंत तर आलंच पण तेंनी वीरपुरुषांना देखील सोडलं नाही !
बरं म्हटलं वाटुन का घेईनात निदान त्यांच्या आदर्शावर तरी चालतील !
पण काय झालय !
ह्या असल्या फुटकळ स्वाभीमानापायी व राजकारणापायी द्वेषाची ठिणगी टाकली गेली
हे त्याचंच प्रतीक
मुळात त्या पुरुषांचे अनुकरण करने दुरच
त्यांचे तत्व जाणणे दुरंच पण
नुसते शिवभक्त ,शिवश्री,भिमसैनिक,मुलनिवाशी,पेशवा इ.
नाव स्वतःच्या नावासमोर लावुन हे लोक त्या महापुरुषांचे विचार न वाचता जरी वाचले तरी त्याचे अनुकरण न करता
चक्क तुलना करतात
हे बव्हांशी तेच असतात जे आपल्या एखाद्या नेत्याच्या माग गोंडा घोळताना दिसतात!

आणी आपले साधे लोक त्यावर टाळ्या पिटतात पण एक विसरताय
कि ते दोघेही  आपल्या कार्यात असो वा क्षेत्रात नायक असतात म्हणुन त्यांच नाव
आज आपण अभिमानान घेतोत.
तर मला एकच वाटत की
महापुरुष कोणीही असो त्यांची तुलना करुन त्यांच्या महान कार्याला कमीपणा आणु नका तीतकी आपली लायकी नाही  
पटल तर ठेवा नाहीतर काय असतं!
आज मला हे तीव्रतेने जाणवलं ती कमेंट वाचुन!
कि ग्रेट कोण !

बाजीराव©

Friday, 15 January 2016

ये परतुनी भाग तिसरा अव्यक्त प्रेमगाथा

आरे प्रसाद
आरे प्रसाद!
तु विनुला पाहीलस का रे ? हापाहापत्या स्वारात रवी विचारत होता!
आत्ताच तर इथ होता ! कुठे गेला कुणास ठाऊक !
खांदे उडवत प्रसादने सांगीतलं !
तो बघ तिकडे बसलाय त्या ब्लॅक जर्सीवाल्या ग्रुपजवळ .
असे सौरभ जोरात ओरडुन सांगतो तो
रवी त्या दिशेने तात्काळ पळत जातो.पुर्ण शरीर घामाने डबडबलेल ,केस practice ने विस्कटलेले अश्या अवस्थेत तो त्या ग्रुपजवळ जाऊ लागतो
तर त्याला एक वेगळाच ग्रुप दिसत असतो ओळखीचा तर नाही पण विनु बसलाय म्हणजे काहीतरी असणार म्हणुन तो  जोरात तिथे जात असतो पण
विनु त्याला येताना बघतो अन झटकन वीज चमकावी अन माणसाने सावध व्हावे!
तसे उठुन सामोरं जातो !

रवीला भेटताच विचारतो
अरे बाबा ते 100मीटर च्या रेस cancel झालत्याना तर
बसलो होतो गप्पा मारत थोडा
पण तुला काय झाल इतक घामाघुम झालायस
खुप पळलास का?
इतक बोलल्यावर रवीला काय बोलु हेच कळणा त्याच्या लक्षात येत होत की काहीतरी बदल.
बदल झालाय !
विनय मधे
पण तरिही मनातील ही शंका सोडुन ही तो ऊत्सुकता आळवुन म्हणाला
हे बघ ,
काय आहे तुझ्यासाठी ते आत्ताच कळाली बातमी !
काय आहे बघु ?
     तो थोडासा खौडकर मुलासारखा तो मागे लपवत रवी म्हणाला
पण आधी पार्टी देणार असलास
तरचं  सांगतो भो
येवढा घामाघुम झालोय तुझ्यामागे पळुन पळुन बोल देतो की नाई !

आरे यार तु भी क्या याद रखेगा चल कँटीनला ! खांदे उडवत विनु उत्सुकतेने म्हणाला
च्यायला काय चिंगुस आहेस रे तु! रवी  म्हणाला
ते काय आहे विनु आपण ना लहानपणापासून सोबत आहोत !
तुला म्हणुन सांगतो की आपण दुर आहोत म्हणुन आपले पालक आपल्याला पैसे पाठवतात
एकवेळ ते स्वतःस काइ घेत नसतात पण आधी पैसे पाठवत असतात
असे पैसे आपल्याला वापरण्याचा निश्चितच अधिकार क्रमप्राप्त आहे .
पण जर आपण ते अनाठायी करणार असुत तर
तस वागन हा घरच्यांचा विश्वासघात  होतो
आणी मी अजुन तरी कुणाचा विश्वास घात नाही केलेला.
तेवा मी माझ्या उडी एवढाच अंगण ठरवित असतो!
भले ही कोणाला मी विचित्र वाटो !

जय हो बाबा विनय दास की !
बाबा आपल्या भावना पोचल्या बरं
इणी हे आपल कँटीन आलेलं आहे!
चल दोन चहा आणी सोबत दोन प्लेट भजी पण मागवं
यार जाम भुक लागलीय रे आणी आता  तर हे बघ  साडेपाच वाजलेत !
मग विषय बदलवित  विनुला म्हणतो
हा तर काय म्हणत होतास विनय तु
विनु चकीत होऊन !
काय ?
रवी यार लाजतोस काय रे माहीतेय मला
तु बोल यार !
विनु तर पार बुचकळ्यात पडतो
अरे पण मी का लाजु लाजायला काय मी काय हे वाटलो का!
तसा तु निर्लजच आहेस काय !

विनुच बोलण मधेच तोडत खोडी काढत रवी म्हणतो
हा तर मग त्यात काय
निर्लज्जम् सदा सुखी
माहीत नाही का !
अस बोलुन एकमेकांना टाळ्या देऊन हसत असतात तोवर अॉर्डर येते
हा तर मग मला काय दाखवणार होतास सांग !
थोडा सब्र तो कर यार !
हे बग रवी आताअतीच करायला राव तु !
हो का बरं
बर दाखवतो पण मला सहा महीन्यापुर्वी
मी प्रेमात पडणे शक्यच नाही अस कोणीतरी म्हटल होतं आठवतय का रे!
चोर पकडावा तसा काहीसा भाव विनुच्या चेहऱ्यावर येतो!
तरी आव आणुन

आआ म्हणलं असेल कोणी मग काय त्यात एवढे
काळ बदलाचा कर्ता आहे माहीत नाही का!
हो  माहीतेय पण काळाहुन बलवान असा कर्ता असतो जो कधी कधी
कित्येकाना कित्येकदा आपली तत्व बदलण्यास भाग पाडतो !
आपला स्वभाव आपला स्वाभिमान सगळ सगळ लवचिक बनवतो अगदी रबरा सारख
हे तो  इथे असतो 
छातीकडे हात ठेवुन म्हणतो!

हे हृदय परिवर्तनाचं मुळ आहे रे
काय म्हणतो!
बरं झाल तुझं प्रवचन
तर आता सांगशील का बरं ?
अरे मला एक वही सापडली
त्यात तु म्हटलास ना प्रेम काय असतं ते
बघ अजुन ही असे वेडे आहेत
चुकीच बोलल्यासारख करुनन सॉरी "होते"
पण काय  रे ह्यात बोल ना !
सांगतो ना !

ही  आहे एक अव्यक्त प्रेमगाथा !
जी फक्त व्यक्त न करण्यामुळे अपुर्ण राहीली.......
एवढे बोलतं तो डायरीचं पान उघडतो !

पहील्या पानावर एका मुलीचा फोटो

असतो ,
कसली भारीय राव
बहुधा ही तीच असावी ! असे शब्द आपोआप रवीच्या तोंडुन निघाले !
पण त्याचा फोटो कुठयं !
म्हणुन दुसरं पानं उघडतो तीथे काही ओळी लिहीलेल्या असतात!
"कदाचित तुम्हाला वाटेल
  माझं आयुष्य भ्रमराप्रमाणे आभासी सुखासाठी व्यर्थ केलं !
   मृगृजळ असणार्या गोष्टीपायी उधळलं
कदाचित मी तिला विसरलो ही असतो पण
      खर तर मी तो सल उरात ठेऊन जगुचं शकलो नसतो !

आयुष्यात मागे वळुन बघताना
   कळाले...
की तिच्यावर प्रेम करताना कधी प्रश्न नवताच

ति सोडुन जाइन न जाईन
आणी  ,गेलीच तर जगु शकेन मी !
कधी ही विचारच नाही केला की
माझ्या भावनांचा स्विकार करेल ती ?
..
कि कधी तीला
    माझ्या खर्या भावना तरी कळतील ?
की ती देखील  मला ईतरांप्रमाणे  उडते पाखरु समजेल ...जेव्हा की माझी तयारी तिच्यात भुंग्या प्रमाणे गुरफटून मरण्याची देखील होती ,.....

पण खरं तर माझं आयुष्य  मी भ्रमराप्रमाणे ही जगु शकलो नाही तो निदान आपल्या प्रिय फुलाचा मकरंद तरी मिळवतो त्याच्या भावनांना वाट तरी देतो!
मि ते ही करु शकलो नाही!

निश्चीतच असा विचार नवताच केला ती काय उत्तर देइल याचा ?
,
    प्रेमात दरवेळी ति हो म्हणावीच अस नसत
अन नेहमी प्रेमकथेनं पुर्ण व्हावं असही नसत ....
कारण अर्धवट राहीलेल प्रेमच पुढे जगण्यासाठीच कारण असत
की कुठेतरी ती भेटेल यासाठी मन जगास निरखत असतं !
शेवटी प्रेमाच्या त्या  यमदुतास हवा असतो त्याग आणी समर्पण .....

जे होतं ,आहे आणी पुढेही तिच्यासाठी होणार असतं !!

तुमचाच मित्र ,
सुहास
हे वाचल्यावर मात्र दोघांची उत्सुकता वाढली
रवी हळुच बोटानी पान उलटलं त्यावर सुंदर हस्ताक्षरात
लिहीलेल होत तो वाचु लागला!

तारिख नाही आठवत पण तो कॉलेजचा पहीला दिवस होता मी तसा शहरात नवीन कदाचित येथील वातावरणास
अनभिद्न
गेट मधुन सावकाश पाउले टाकत फाउंटन जवळ येउन थबकलो.
काही टवाळ senior नी मला अडवले होतो.बहुधा रँगिंग करण्याच्या  विचारात ते होते
नवीनच आहेस नां!?  एक दरडावलेला अवाज.
उत्तर काहिच नाहीच नाही मी अजुन ही जमीनीकडेच बघत होतो.
हं.,,,,.,,,हलकासा अवाज आला!! काय नाव रे बेण्या तुझं !
   काय ! तो म्हणाला
आरं नाव इचारल पावट्या ,
सु सु सुहास....
मग सरळ सांग ना सांग न
सुहास .....सुसु सुहास काय लावय हे ?
अपमान केलास तु आमचा प्रश्नाच उत्तर नीट न देऊन
कळल काय !
मम मी अपमान ? गोंधळुन सुहास म्हणाला
मग काय आरती केलीस व्हय रे ?
लई झाली chatting
आता action scene
चल आम्ही सांगतो ते कर
अं......... तो म्हणाला
ऐकु येत नाही का!! पुन्हा तोच अवाज
सांगा ना!! तो म्हणाला
त्याला हा प्रकार नवीनच होता
पण नजर अजुनही खालीच होती
शेजारुनच एक मुलींचा ग्रुप चाललेला असतो
त्यातील यशुचे लक्ष बहुधा ह्याप्रकारॉवर पडते
तीला लक्षात येते नक्की काय चाललय ते
ती मुळातच बिंधास्त स्वभावाची अन तितकिच मनाने चांगली
ति आपला ग्रुप घेउन तिकडे वळते
काय कॉलेजच्या सडक्या कांद्यानो
लाजा काय वेशीला टांगल्या हो रे !!!
एक मोठा खडा अवाज घुमतो
सर्व  आश्चर्याने बघु लागतात
काय!          
        एक टवाळखोर म्हणतो.

लाज नाही वाटत ,स्वतःला  senior म्हणावता आणि नवीन आलेल्याना त्रास  देता
तुम्हाला ना शेवटची warning हा बेट्या हो
सोडा त्याला !
कोण ग तु कारटे!!     दुसरा टवाळखोर
थांब थोड मी कोण ते माझा भाऊच सांगल !
बोलवतेच आता थांब !

बोलव बोलव
ते काय आमदार आहे व्हय
हाहाहा
एक टवाळखोर मधेच म्हणाला.
आठवतोय
मागच्या आठवड्यातला चौकात पोलिसाचा मार !
ते खाणारे तुम्हीच ना रे  !
सगळे चुप्प !

तो PI माझाच भाउ ,, बोलवु पुन्हा !!
हो  रे बोल की आता
ततततततोतो तुझा भाऊ !!!!
त्यामुलांची बोबडीच वळली
सससस सॉरी ..
इतकेच बोलुन ते पटकन  निघुनही गेले
तोपर्यंत  मी फक्त डोळे विस्फारुन बघत होतो...........तोच कॉलेज सुरु झाले.तेवा मि काहीसा भानावर आलो....
ते ति माझ्याजवळ आली ,
आणी म्हणाली
कुठलूया फँकल्टीला आहेस रे!
b.sc chemistry
मि घाबरत घाबरत बोललो !
अरे मग घाबरतोस काय !
हे बघ मी पण नवीनच आहे ना !
हेय तु इथला नाहीस का !
  नाही 
मी  एवढेच बोललो
जाउ दे घाबरु नको !
काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला सांग !
काय चल येते अस म्हणत ती ग्रुपकडे जाते पण लगेच का कुणास ठाऊक परतते

आरे हो !
विसरलेच रे
मी यशांजली ! निकनेम यशु
आणी तु
     सुहास !
छान भेटु पुन्हा चल बाय! म्हणत ती घाई घाई ग्रुपकडे गेली सुद्धा तिचा ग्रुपदेखील जो इतकावेळ गप्पा मारत थांबला होता हळुहळु पुढे सरकत गेला अन शेवटी लहानसा ठिपका बनुन नजरेआड झाला !
पण ती भेट मात्र कायमची लक्षात बसली अगदी जणु त्या ठिपक्याचा व्रण मनावर व्हावा तशी!
ती पहीली भेट!
चल चल पटकन पान उलटं !
आता विनुची उत्सुकता चाळवली गेली पण तोपर्यंत चहा आणी भजी संपली होती म्हणुन मग रवी विनुची इच्छा नसतानाही डायरी बंद करुन उठतो
चला राजे उर्वरीत भाग घरी गेल्यावर हा!
ये यार अस असत का राव !
विनु जरा कथा ऐकायला जास्तच excited झालेलाअसतो
पण रवी काही एक न ऐकता कँटीन बाहेर जवळ जवळ पळतोच
त्याला पकडण्याचा प्रयत्न करायला विनय पण पळतो
आरे थांब थांब  ! च्यायला काय मुड खराब केलास राव !

आस म्हणत तो खोटंखोट पाठलाग करत आसतो
तो  रवी
गेट मधुन बाहेर पडुन रस्ता क्रॉस करत आसतो !
विनु गेट जवळ येतो तो त्याला विचित्र दृश्य दिसत

रवी एका स्कूटीला धडकता धडकता वाचुन पाय सटकुन खाली बसलेला असतो ,मम
वही रस्त्याच्या एकाकडेला पडलेली असते  ,
आणी तो मुर्खासारखा स्कुटीवाल्या मुलीकडं बघत असतो
    विनुला विचित्र वाटत ती मुलगीही याच्याकड बघुन हसत असते
का कुणास ठाऊक जणु या आधी ते एकमेकांना ओळखात होते ?
पण हा सगळा विचार सोडुन विनु त्याच्याकड बघुन फिदी फीदी हसायला लागला !
साल्या तुला एक मिनीट एकट काय सोडल तु तर मरणाच्या दारातच येऊन टेकलास की रे!
कायम सोडून गेलो तर काय होईल , येडं कुठलं !
आणी पुन्हा हसला ,
रवी सावरुन उठला त्या मुलीला काही न बोलता फक्त हसला आणी मग विनुनी आधार देत ,
हात खांद्यावर घेऊन त्याला रुमवर नेल !
जाताना तो ही त्या मुलीकड पाहत होता ती भेट हृदयात साठवत होता ,
का कुणास ठाऊक विनुला प्रश्न पडला
ही तीची आणी त्याची पहीली भेट होती ?
मनानं उत्तर दिलं ......नाही निश्चितच नाही रे!

Thursday, 14 January 2016

कधीतरि मन माझे.

धडधड हृदयाचे ठोके
                    कसे वाढतात
ताठरलेल्या डोळ्यांत
                  आश्रु कसले जमतात
भिरभिरणार्या पायात
                   जडत्व कसले येते
कधीतरी मन असे कासावीस होते!!

वाक्यांतले शब्द कधी
                    उंचउंच उडतात
जिभेवर आले शब्दतरी
               का ओठावरीच विरतात
एकांती ही शांतता का
                 मना चिरत जाते
कधीतरी मन असे कासावीस होते!!!!

आठवांचे झरे असे
                 खळाळुनी वाहतात
मस्तावल्या हत्तीसारखे
                  डोंगराला भिडतात
कधी मन खोल दरीत
                   धबधबा बनते
कधीतरी असे मन कासावीस होते
बाजीराव©

अणुनाते

नाती ही अणु सारखी असतात .

त्याँच्या मनाच्या न्युक्लीयस मधे असतो
प्रोटॉन
म्हणजे गोडवा
तर
दुरुन काहीसा फिरणारा इलेक्ट्रॉन प्रमाणे असते ही कटुता  .

ती जाते (like donating of electron) 
ती येते (accepting of electron )
जर मनाना प्रेमाचा स्पर्श  भिडला !

पण काहीही झाल तरी हे नाते असते

अविभाजित 
अगदी अणु सारखेच!

  नात्यांमधे असतात अनेक अशा orbit

फिरतात त्यामधे  इलेक्ट्रॉन
अगदी
विविध रंगी नात्यांसारखे !
विविधढंगी स्वभावासारखे !
तरी एका सुत्राभोवती फिरत राहतात आयुष्यभरासाठी
एकमेकांसाठी
नाते हे अणुसारखेच असतात!

बाजीराव©

Monday, 11 January 2016

एक पक्षी एकटाच

एक पक्षी जरा 
             उनाडसा
मनस्वभावे जरा
              चंचलसा
फिरुनी गगनी
            स्वच्छंदसा
एक पक्षि एक एकटासा !

रानी असुनी
             हिरवळ सारी
मन द्वाड बहु 
               मारी भरारी
विरहाने धडधडे
               हृदय चोरटे
  आठवणी दग्धीती मज
जणु
       रुतल्यासम बाणासा!!
एक पक्षि एकटासा

स्वच्छंदी पक्षि 
                हसतो जरासा
एकट्यात जाऊन
                बसतो जरासा
ते क्षण आठवावे
                सुवर्णासे
रमावे असेकी अढळपदीच्या
              ध्रुवासा!
एक पक्षि एकटासा

बाजीराव.©

Sunday, 3 January 2016

कुपमंडुक

कधी कधी माझ झोपेत अस होत
स्वप्नात आलेल मनात उतरतं
भावलच मनाला ह्रदय घुसळवतं
अस कल्पनांच दही मि कागदावर मांडतो
त्यात अलंकारोपमांचे काप टाकतो
पाहतो तो ही पद्य कोशींबीर होते
पन मी ती एकटी नाही हो खात
कारण आई नी शिकवल होतं ना
देतो तो देव अन राखतो तो
कुपमंडुक

बाजीराव©

जुन्या वाड्याच मनोगत

वाड्याचही एक मनोगत आहे
कठोर भिंतीमागे त्याचही एक मन आहे
मला दिसतायत ते चिरे ढासळताना
सोबत इतिहासात आपलच मढ गाडुन घेताना

बसलो हो भग्नवाड्यापाशी
बघितला वास्तुपुरुष प्रकटताना
दिसत होत डोळ्यात पाणी अण आनंद ही
सार्थकी जीवन आठवताना
हलकेच हसला ,अलगद बसला मग बोलला

" अरे खंत कशाची करु मावळ्या भाग्यवंत मी थोर बहु
जाहलो आसरा त्यांचा
ज्या मर्दानी पाहीला जरिपटका
अटकेपार फडकताना
पाहीले त्यांचे संसार सुखाचे
इथे विरल्या किंकाळ्या
पडले होते पानीपतला जे
धर्मासाठी लढताना"

तेवा हळुच निरखिलं ती भावुकता दिसली हलताना

टिपले पाझर हलकेच ,म्हणाला

"पाहील्या तुझ्या  रणवीर पिढ्या त्या
पाहीला त्यांचा तेजस्वी त्याग
एक अपेक्षा तुजकडुन लेकरा
बदलो कितीही काळ  वेळ ही
विसरु नको या मातीला
नको विसरु तु या धर्माला
कारण
पाहिलय मी इथल्या इंच इंच भुमीवर
सांडलेल रक्त साकळताना"

बाजीराव©

गुढीपाडवा व शालिवाहन शक संबंध

गुढीपाडवा व शालिवाहन शक संबंध

भारतावर हजारो परचक्र येत त्यास येथील हिंदुधर्माभिमानी सत्ता नेहमी प्रतिकार करत!यात नेहमीच यश मिळत होते असे नाही पण जर पराजय मिळाला
तर ते इथच स्थिरावत असत ! बर्याच प्रमाणात त्यानी इथल्या चालीरिती स्विकारत पण काही असेही होते की ज्यानी आपल्या चालीरिती धर्म उपासना नियमादी इथल्या लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला! त्याचे परिणाम स्वरुप लोकात असंतोष माजला त्याचे परिवर्तन संघर्षक्रांतीत झाले .
असच काहीस सम्राट विक्रमादित्य नंतर  घडलं विक्रमाचा पराक्रमी मुलगा श्रीमुख ज्याने ख्रीस्तपुर्व२७ मधे मगध वर स्वारी करुन कण्वाना जिंकले
नंतर तो
दृक्षिणापथ म्हणजे तत्कालीन दक्षिणदेश जो साधारणतः नर्मदेपासुन हिंदसागरापावेतोचा भुभाग ! याचा अधिपती बनला !त्याने आयुष्य शकाशी लढण्यासाठीच खर्चिले होते यात त्याला आंध्रांनी मदत केली परंतु जसजसे कुशानानी वायव्य हद्दीवर शकाना झोडायला सुरुवात केली तसतसे  शक दक्षिणपथाकडे वळले त्यावेळी त्यानी श्रीमुखास मात दिली ही घटना ख्रीस्तोतर 16 साली घडली जेथे युद्धात तो मारला गेला.
नंतर शाक्तधर्मी शकांची सत्ता महाराष्ट्रावर बळावली त्यांचचा तो नैतिक धार्मिक सांस्कृतिक  अत्याचार  वाढु लागला
त्यावेळी स्थानिय जनतेत असंतोष पसरत होता त्यावेळी श्रीमुखाची मुलगी व शालिवाहनाची माता जी शकांच्या हाती लागली होती.ती कुमारी माता अशा अवस्थेत शकांच्या तावडीतुन सुटली .व पैठण नजिकच्या कुंभारावाड्यातआश्रयास गेली
पुढे तिचा मुलगा आपल्या कर्तुत्वाने  व पराक्रमाने गोंडोफेरव या पह्लव राजाचा सेनापती झाला .
त्याने गनिमी काव्याची पद्धत स्विकारली होती त्यासाठी त्याचा विश्वास हा जलद हालचालीवर होता त्यासाठी हत्ती उंट अश्या प्राण्यांऐवजी फक्त घोडदळ व भालाईत व तलवाराबाज आणी काही धनुर्धारी अश्या प्रकारची रचना केली होती जी अत्यंत प्रभावी होती .
खास करुन शकांसाठी
कारण शक असेच लढत असत त्याना शालीवाहनाने त्याच पद्धतीने काटशह दिला.
ते उत्तरभारतीयानी त्यास शातकर्ण किंवा सातकर्ण (कर्ण हे उपनाम कुमारीपुत्रांस असत तरीही कर्णी म्हणजे घोडा व हा शालिवाहन मुख्यतः घोड्यावर स्वार असे )असे संबोधले तसेच सेनापतीचे अश्व हे वाहन असे तसेच त्याने घोड्यांच थोरलं पथक उभारले होते म्हणुन विवाहावेळी त्याचे नाव शातवाहन असे झाले त्याचे पुढे मर्हाष्ट्री भाषेत शालिवाहन असे झाले असावे.
याच शालीवाहनाचा आंध्रसम्राटाची कन्या नायनिका हिच्याशी झाला होता.
तद्नंतर शालीवाहनाने आपले लक्ष आपल मुख्य उद्देष शकांचा उच्दाकडे होता त्याला आंध्रांनी संपुर्ण सहकार्य दिले तसेच त्याने पह्लव सत्ता खालसा करुन पुरुषपुरचे राज्य मिळवले
त्यानंतर शकांच्या दक्षिणपथातील राज्यावर सतत तीन्ही बाजुस आघात सुरु केले .
तसेच जनतेतही बंड उठविले
रानटी जमातीना हाताशी धरुन
शकाना अत्यंत हतप्रभ केले व शेवटी
फाल्गुन शु पौर्णिमेला प्रतिष्ठान उर्फ पैठण नगरी त्याने जिंकली.
महाराष्ट्र सहीत दक्षिणपथ बह्वांशी स्वतंत्र केला
तेव्हा लोकांनी मोठा स्वतंत्योत्सव केला!
जिकडेतिकडे लोकानी दारावर गुढ्या उभारल्या पहीली गुढी उभारण्याचा मान राजकुमार वेदीश्रीस मिळाला
व चैत्र शु प्रतिपदैस शालीवाहनास राज्याभिषेक झाला त्यासोबतच त्याने आपला संवत म्हणजे शालीवाहन शक सुरु केला 
तेवापासुन चैत्र शु प्रतीपदेस गुढीपाडवा हा दक्षिणपथात साजरा केला जातो. 
तो बहुतांशी महाराष्ट्र  कर्नाटक  गुजरात  आंध्रप्रदेश आदी राज्यातच होतो.
कारण शालीवाहनाच राज्यरोहनावेळी जेवढ राज्य दक्षिणपथात पसरल होत तेवढ्याच प्रदेशात हौतो.
बाकी शालीवाहन शक हा संपुर्ण दक्षिणपथात विक्रमसंवता प्रमाणेच वापरला जातो.एक विशेष मातृकुलाच नाव लावणारे राजघराणे एवढे एकच होते तेंनी 
पुढे राज्य संपेपर्यंत आईच नाव लावल  सदर  लेखावरुन दिसुन येते  हा गुढीपाडवा व शालीवाहनाचा संबध आहे तसेच त्याचा 

संभाजी राजेंची हत्येशी  काहीही संबंध नाही.

बाजीराव (ओंकार )पांडव ©

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...