कधीकधी धुंद गंध
असा वाहात जातो
कधी कधी मंद मंद
पाऊले ही टाकीतो
उमलाता कळ्या कश्या
सुगंध हा पसरितो
भुलुनी त्या सुगंधास
भ्रमर मी वेडावतो!!1!!
कधी कधी मयुरपंख असा
जीवास भावतो
रंग तो गडदसा पाहुन
तुला आठवीतो
वर्षावतो जणु वळीव
हृदयाच्या अंतरी
रानात जसा पावसात असा
मयुर कुठे नाचतो!
कधी कधी दवबिंदु का
चकाकुनी सतावतो
जगण्याचे ते एक सार
सांगुन मज सावरितो
जरी असले दो घटीकेचे जीवन
वाट प्रेमाची दाखवितो
No comments:
Post a Comment