वाड्याचही एक मनोगत आहे
कठोर भिंतीमागे त्याचही एक मन आहे
मला दिसतायत ते चिरे ढासळताना
सोबत इतिहासात आपलच मढ गाडुन घेताना
बसलो हो भग्नवाड्यापाशी
बघितला वास्तुपुरुष प्रकटताना
दिसत होत डोळ्यात पाणी अण आनंद ही
सार्थकी जीवन आठवताना
हलकेच हसला ,अलगद बसला मग बोलला
" अरे खंत कशाची करु मावळ्या भाग्यवंत मी थोर बहु
जाहलो आसरा त्यांचा
ज्या मर्दानी पाहीला जरिपटका
अटकेपार फडकताना
पाहीले त्यांचे संसार सुखाचे
इथे विरल्या किंकाळ्या
पडले होते पानीपतला जे
धर्मासाठी लढताना"
तेवा हळुच निरखिलं ती भावुकता दिसली हलताना
टिपले पाझर हलकेच ,म्हणाला
"पाहील्या तुझ्या रणवीर पिढ्या त्या
पाहीला त्यांचा तेजस्वी त्याग
एक अपेक्षा तुजकडुन लेकरा
बदलो कितीही काळ वेळ ही
विसरु नको या मातीला
नको विसरु तु या धर्माला
कारण
पाहिलय मी इथल्या इंच इंच भुमीवर
सांडलेल रक्त साकळताना"
बाजीराव©
No comments:
Post a Comment