धडधड हृदयाचे ठोके
कसे वाढतात
ताठरलेल्या डोळ्यांत
आश्रु कसले जमतात
भिरभिरणार्या पायात
जडत्व कसले येते
कधीतरी मन असे कासावीस होते!!
वाक्यांतले शब्द कधी
उंचउंच उडतात
जिभेवर आले शब्दतरी
का ओठावरीच विरतात
एकांती ही शांतता का
मना चिरत जाते
कधीतरी मन असे कासावीस होते!!!!
आठवांचे झरे असे
खळाळुनी वाहतात
मस्तावल्या हत्तीसारखे
डोंगराला भिडतात
कधी मन खोल दरीत
धबधबा बनते
कधीतरी असे मन कासावीस होते
बाजीराव©
No comments:
Post a Comment