का शिकु मी
अगदी परवाची गोष्ट
आईला भेटायला गेलतो परवाच स्टेशनला .
तिथल्या पेट्रोल पंपाजवळ भिक मागनारी भांवंड दिसत होती काही
तो एक तेराचौदा वर्षाचा मुलगा मला बघुन आला पैसे मागायला
तेला द्यायला सुट्टे तर नवते पण खिशात चॉकलेट्स होती
त्यातली दोन काढुन दिली आणी म्हटलो बाबा यावर नाही देऊ शकत
आणी गाडी ची
वाट पाहत उभा राहीलो
तर त्यांच ते काम चालुच होतो
तर असाच पुन्हा तो थोडा जवळ आला ते फक्था कुतुहल म्हणुन विचारल की
काय रे कितवी ला आहेस तर म्हणाला
दादा पहिलीलाच शाळा सोडली आता कामावरुन आलो आनी हे लहान भाऊ अन बहीणीला मदत करतोय !
त्याला घरच्यां बद्दल विचारल तर म्हणे ते दहा भावंडे आहेत दोन बहीणींचे लग्न झाले
तेवा त्याला शाळेत का जात नाहीस हे विचारल तर उत्तराचा आशय काहीसा असा होता!
परिस्थिती संघर्ष करायला लावते
जन्मल्या पासुन काय करु शाळेचे चोचले करुन !
दोन पैशाला या जगात किंमत
अक्षरे शिकुन काय करु तुमच्याशी बरोबरी व्हईल का
पोटात खड्डा पडला की कळत सबसे बडा रुपया
हे लहान भाऊ बहीण रडायला लागृले की सुचत नाही काय योग्य काय अयोग्य मग शिकुन सभ्य का बनाय
बालकामगार बंद म्हणे मग आमाला अन माझ्या या भावाबृहीनीना खाऊ घालीन का सकार फुकट
का शिकु मी?
सुन्न झालो नुसता ....
बाजीराव©
No comments:
Post a Comment