Sunday, 3 January 2016

गुढीपाडवा व शालिवाहन शक संबंध

गुढीपाडवा व शालिवाहन शक संबंध

भारतावर हजारो परचक्र येत त्यास येथील हिंदुधर्माभिमानी सत्ता नेहमी प्रतिकार करत!यात नेहमीच यश मिळत होते असे नाही पण जर पराजय मिळाला
तर ते इथच स्थिरावत असत ! बर्याच प्रमाणात त्यानी इथल्या चालीरिती स्विकारत पण काही असेही होते की ज्यानी आपल्या चालीरिती धर्म उपासना नियमादी इथल्या लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला! त्याचे परिणाम स्वरुप लोकात असंतोष माजला त्याचे परिवर्तन संघर्षक्रांतीत झाले .
असच काहीस सम्राट विक्रमादित्य नंतर  घडलं विक्रमाचा पराक्रमी मुलगा श्रीमुख ज्याने ख्रीस्तपुर्व२७ मधे मगध वर स्वारी करुन कण्वाना जिंकले
नंतर तो
दृक्षिणापथ म्हणजे तत्कालीन दक्षिणदेश जो साधारणतः नर्मदेपासुन हिंदसागरापावेतोचा भुभाग ! याचा अधिपती बनला !त्याने आयुष्य शकाशी लढण्यासाठीच खर्चिले होते यात त्याला आंध्रांनी मदत केली परंतु जसजसे कुशानानी वायव्य हद्दीवर शकाना झोडायला सुरुवात केली तसतसे  शक दक्षिणपथाकडे वळले त्यावेळी त्यानी श्रीमुखास मात दिली ही घटना ख्रीस्तोतर 16 साली घडली जेथे युद्धात तो मारला गेला.
नंतर शाक्तधर्मी शकांची सत्ता महाराष्ट्रावर बळावली त्यांचचा तो नैतिक धार्मिक सांस्कृतिक  अत्याचार  वाढु लागला
त्यावेळी स्थानिय जनतेत असंतोष पसरत होता त्यावेळी श्रीमुखाची मुलगी व शालिवाहनाची माता जी शकांच्या हाती लागली होती.ती कुमारी माता अशा अवस्थेत शकांच्या तावडीतुन सुटली .व पैठण नजिकच्या कुंभारावाड्यातआश्रयास गेली
पुढे तिचा मुलगा आपल्या कर्तुत्वाने  व पराक्रमाने गोंडोफेरव या पह्लव राजाचा सेनापती झाला .
त्याने गनिमी काव्याची पद्धत स्विकारली होती त्यासाठी त्याचा विश्वास हा जलद हालचालीवर होता त्यासाठी हत्ती उंट अश्या प्राण्यांऐवजी फक्त घोडदळ व भालाईत व तलवाराबाज आणी काही धनुर्धारी अश्या प्रकारची रचना केली होती जी अत्यंत प्रभावी होती .
खास करुन शकांसाठी
कारण शक असेच लढत असत त्याना शालीवाहनाने त्याच पद्धतीने काटशह दिला.
ते उत्तरभारतीयानी त्यास शातकर्ण किंवा सातकर्ण (कर्ण हे उपनाम कुमारीपुत्रांस असत तरीही कर्णी म्हणजे घोडा व हा शालिवाहन मुख्यतः घोड्यावर स्वार असे )असे संबोधले तसेच सेनापतीचे अश्व हे वाहन असे तसेच त्याने घोड्यांच थोरलं पथक उभारले होते म्हणुन विवाहावेळी त्याचे नाव शातवाहन असे झाले त्याचे पुढे मर्हाष्ट्री भाषेत शालिवाहन असे झाले असावे.
याच शालीवाहनाचा आंध्रसम्राटाची कन्या नायनिका हिच्याशी झाला होता.
तद्नंतर शालीवाहनाने आपले लक्ष आपल मुख्य उद्देष शकांचा उच्दाकडे होता त्याला आंध्रांनी संपुर्ण सहकार्य दिले तसेच त्याने पह्लव सत्ता खालसा करुन पुरुषपुरचे राज्य मिळवले
त्यानंतर शकांच्या दक्षिणपथातील राज्यावर सतत तीन्ही बाजुस आघात सुरु केले .
तसेच जनतेतही बंड उठविले
रानटी जमातीना हाताशी धरुन
शकाना अत्यंत हतप्रभ केले व शेवटी
फाल्गुन शु पौर्णिमेला प्रतिष्ठान उर्फ पैठण नगरी त्याने जिंकली.
महाराष्ट्र सहीत दक्षिणपथ बह्वांशी स्वतंत्र केला
तेव्हा लोकांनी मोठा स्वतंत्योत्सव केला!
जिकडेतिकडे लोकानी दारावर गुढ्या उभारल्या पहीली गुढी उभारण्याचा मान राजकुमार वेदीश्रीस मिळाला
व चैत्र शु प्रतिपदैस शालीवाहनास राज्याभिषेक झाला त्यासोबतच त्याने आपला संवत म्हणजे शालीवाहन शक सुरु केला 
तेवापासुन चैत्र शु प्रतीपदेस गुढीपाडवा हा दक्षिणपथात साजरा केला जातो. 
तो बहुतांशी महाराष्ट्र  कर्नाटक  गुजरात  आंध्रप्रदेश आदी राज्यातच होतो.
कारण शालीवाहनाच राज्यरोहनावेळी जेवढ राज्य दक्षिणपथात पसरल होत तेवढ्याच प्रदेशात हौतो.
बाकी शालीवाहन शक हा संपुर्ण दक्षिणपथात विक्रमसंवता प्रमाणेच वापरला जातो.एक विशेष मातृकुलाच नाव लावणारे राजघराणे एवढे एकच होते तेंनी 
पुढे राज्य संपेपर्यंत आईच नाव लावल  सदर  लेखावरुन दिसुन येते  हा गुढीपाडवा व शालीवाहनाचा संबध आहे तसेच त्याचा 

संभाजी राजेंची हत्येशी  काहीही संबंध नाही.

बाजीराव (ओंकार )पांडव ©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...