आज सहज fb वर फिरत होतो एक पोस्ट होती संभाजीराजेंच्या राज्याभिषेक दिनानिमीत्त
पोस्ट काहीशी अशी होती
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी १६व्या वर्षी लिहीली पण माझ्या राजानं बुधभुषणम् वयाच्या 14व्या वर्षी लिहीला!
तस पाहील तर शंभुराजांवर मी जीवापेक्षा जास्त प्रेम करतो
त्याना आम्ही तरुण आदर्श मानतो!
त्यांचे तत्व आदर्श मानतो!
तसेच आम्ही ज्ञानेश्वराना देखील गुरुच मानतो नव्हे राजे देखील स्वतः वारकरी असो की रामदासी संप्रदाय यांचा कीती मान ठेवायचे हे आपणा सर्वास माहीतच आहे की !
मग तुम्ही तुलना कुणाची करता?
तुलना का करता?
हे फक्त या एका उदाहरणापुरतेच नृव्हे हे नेहमीच झालय!
दोन हिंदुधर्माचे आराध्य घ्यायचे आणी त्यात तुलना करायची प
एक लक्षात येत का
की आपण तुलना केव्हा करावी
जर स्वतः तितके समर्थ असु !
पण होत काय
आपल सामाजीक मुल्य भले ही शुन्य असु आपण समाजासाठी वैयक्तिक गरजा सोडता निस्वार्थ भावनेने काय केले हे आपले आपलेच आत्मचिंतन न करता
या अशा दोन महापुरुषांच्या जर तुलना करु लागलोत तर तुम्हाला मुर्ख म्हणाव लागेल
कारण
आपणा कीती खोल पाण्या पोहु शकतो हे जाणल्याबिगर जर नदीत उडी घ्याल निश्चितच मधेच गटांगळ्या खाल
आणी अशा महापुरुषांचे चरित्र हे तर त्यागाचे महासागर असतात .
त्यामानाने तुमचा त्याग बेडकाच्या डबक्याएवढाही नसेल!
मला एक कळत नाही महाराष्ट्रातले महाराष्ट्रातल्या महापुरुषांचे तुलना करायला काय महाराष्ट्र इतका निर्बुद्ध
झालाय का?
निश्चीतच नाही ,
महाराष्ट्राला विचारवंतांची कमी काल ही नवती ती आज ही नाही !
मग हा तुलनेचा उपद्व्याप का?
तर याचे मुळ फालतु जातीय स्वाभिमानात आहे !
आणी राजकारण्यानी तर असे महापुरुष सुद्धा वाटुन दिले!
मला आठवतो माझ्या एका भाबड्या मित्रानं प्रश्न विचारला होता
कि
तुमचा देव कोणचा रं ?म्हंजी
तुमी कोणास्नी मानता?
असा प्रश्न माझ्यावर जणु वीज पडावी तसा पडला !
मन विषण्ण झाले !
मी न बोलता निघु लागताच म्हटला तो
का तुमच्यात कोणीच नाही का!
त्याच्या ह्या वाक्यानी
मला वाटल
हिंदवा सोदरा सर्वे ....ही हिंदुंची व्याख्या किंवा
वर्षंतत्भारतनाम भारतीयत्र संतती ही वेदांची व्याख्या तर आजच्या जमाण्यात लांबच राहीली
हे जातीचं गलीच्छ राजकारण
संतांपर्यंत तर आलंच पण तेंनी वीरपुरुषांना देखील सोडलं नाही !
बरं म्हटलं वाटुन का घेईनात निदान त्यांच्या आदर्शावर तरी चालतील !
पण काय झालय !
ह्या असल्या फुटकळ स्वाभीमानापायी व राजकारणापायी द्वेषाची ठिणगी टाकली गेली
हे त्याचंच प्रतीक
मुळात त्या पुरुषांचे अनुकरण करने दुरच
त्यांचे तत्व जाणणे दुरंच पण
नुसते शिवभक्त ,शिवश्री,भिमसैनिक,मुलनिवाशी,पेशवा इ.
नाव स्वतःच्या नावासमोर लावुन हे लोक त्या महापुरुषांचे विचार न वाचता जरी वाचले तरी त्याचे अनुकरण न करता
चक्क तुलना करतात
हे बव्हांशी तेच असतात जे आपल्या एखाद्या नेत्याच्या माग गोंडा घोळताना दिसतात!
आणी आपले साधे लोक त्यावर टाळ्या पिटतात पण एक विसरताय
कि ते दोघेही आपल्या कार्यात असो वा क्षेत्रात नायक असतात म्हणुन त्यांच नाव
आज आपण अभिमानान घेतोत.
तर मला एकच वाटत की
महापुरुष कोणीही असो त्यांची तुलना करुन त्यांच्या महान कार्याला कमीपणा आणु नका तीतकी आपली लायकी नाही
पटल तर ठेवा नाहीतर काय असतं!
आज मला हे तीव्रतेने जाणवलं ती कमेंट वाचुन!
कि ग्रेट कोण !
बाजीराव©
No comments:
Post a Comment