एक पक्षी जरा
उनाडसा
मनस्वभावे जरा
चंचलसा
फिरुनी गगनी
स्वच्छंदसा
एक पक्षि एक एकटासा !
रानी असुनी
हिरवळ सारी
मन द्वाड बहु
मारी भरारी
विरहाने धडधडे
हृदय चोरटे
आठवणी दग्धीती मज
जणु
रुतल्यासम बाणासा!!
एक पक्षि एकटासा
स्वच्छंदी पक्षि
हसतो जरासा
एकट्यात जाऊन
बसतो जरासा
ते क्षण आठवावे
सुवर्णासे
रमावे असेकी अढळपदीच्या
ध्रुवासा!
एक पक्षि एकटासा
बाजीराव.©
No comments:
Post a Comment