घाई नसावी सुर्योदयाची आधी पहाट तर होऊ द्यावी
घाई नसावी पावसाची आधी गर्दी ढगांची जमु द्यावी
वेळ द्यावा पुर्वेस सुर्यास जाणण्यासाठी
वेळ द्यावा आकाशास मेघ समाविण्यासाठी
घाई नसावी वसंताची आधी पानझड होऊ द्यावी
घाई नसावी उमलण्याची आधी कळी पुर्ण बनु द्यावी
वेळ द्यावा धरेस या नवा बहर येण्यासाठी
वेळ द्यावा कळीस या गंधीत पुष्प बनण्यासाठी.
घाई नसावी अल्पकाळात माणुस जाणण्याची
घाई नसावी स्वभावाची परिक्षा करण्याची
वेळ द्यावा संभाषणास नाते घट्ट होण्यासाठी
वेळ द्यावा नात्यास कधी जाणुण घेण्यासाठी
बाजी©
No comments:
Post a Comment