Friday, 13 April 2018

फिरुनु पुन्हा नवी भासतेस

फिरुनी पुन्हा ,नवी भासतेस
दरवेळी तुझीयात नवे काही
फिरुनी हे मन बघ मुग्ध होते
तुझ्या अनोख्या छटेत बाई
मी गुंगतो पाहता मती गुंगते
उधळन पाहोनी सतरंगी ही
हरवतो चंचल नयनी तुझ्या
फिरुनी भासती नवेच काही
प्रिये अशी तु नवी हरवेळी
गर्दी भावनांची मन ओहोळी
उठती लोट प्रेमलहरींचै हे
नवे दरवेळी तयात काही

बाजी©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...