Friday, 30 December 2016

चिडण्यास कारण

आरे पण लाज वाटायला पाहीजे त्या पैदा करणार्याला.
.. ते भेदरलेले डोळे
रंगवलेल अंग
याचनेसाठी पसरलेले हात
तो बाल रुपातला भिक मागणारा मारुती
वय असेल दोन वर्ष
आत गेलेल पोट ....
डोळ्यात तरळलेले आश्रु
आणी त्याच्यासोबत सेल्फी काढणारी सुसंस्कृत ?माणसे
आशी एक नव्हे अनके मुल सगळी दहा जाऊ द्यान हो सहाच वर्षाखालील
रुमवर आलो अन शेवटी न राहवुन तोंड उघडल
आरे पण लाज वाटायला पाहीजे त्या पैदा करणार्याला
बघितलस ना तु उभ तरी राहता येत होत का ?
तुला दिसले अथवा नाही मला माहीती नाही पण मला त्या मुलाच्या डोळ्यातले भावा दिसले रे अन बघ कासावीस झाला जीव
वाटल त्या मुलाच्या बापाला धराव आन रक्त पडेस्तोवर माराव पण उपाय नवता
अजुन वेळ थांबन ही नकोस वाटु लागल जीव घुसमटु लागला !
म्हणुन घाईघाईनं बाहेर काढलं.........
खरंच माणुस हलकटपणात किती खालच्या पातळीला जाईल ह्याच एक उदाहरण !!
#बाजी

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...