Thursday 22 December 2016

देवा मला

#बाजी ©
देवा मला आयुष्य कस खडतर जगायच!
नियतीला मला तापवायला सांगायचं
पोलादासारख धैर्य माझं मजबुत बनवायच।।
देवा मला आयुष्य ..........
आयुष्याच्या वाटेवर ओझ घेऊन चालायच
चालुन अनोळखी वाटानी खर मला थकायचय
दमायचय,बसायचय आणी पुन्हा उठुन चालायचय।।
देवा मला आयुष्य.......
कठोर अनुभवांचे सामावेत ओढे
..............ती नदी मला व्हायचय
आकाशाशी लावुन पैंज,
................उंच उंच उडायच,
उडण्याआधी ,
.......मला बळ माझ्या पंखात मला आणायचय.।।
देवा मला आयुष्य ..........
दुःखाच्या डोंगराना चढुन मला पहायचय
खोल दरीत निराशेच्या डोकुनही जायचय
संकटाची वादळे देवा सुटावीतआयुष्यात
एकटa एकट मला त्याना जगी हरवायचय।।
देवा मला आयुष्य.......
....हरत आलेली लढाईत देवा मला पडायचय
सुटत चाललेला निर्धाराला पुन्हा पुन्हा आवळायचय
शर झेलायचे छातीवर रण मला लढायचय
मरेपर्यंत देवा मला फक्त आणी फक्त लढायचय!!!
.....
...#बाजी
१७डिसेंबर२०१६

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...